‘बेजबाबदार सरकारला भानावर आणा’; आमदार रवींद्र धंगेकर यांची राज्यपालांकडे मागणी

'सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. जनतेला महागाईचे, दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत. पण, सरकार जनतेला कुठलीही मदत करताना दिसत नाही. या बेजबाबदार सरकारची योग्य ती दखल घेऊन यांना भानावर आणा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी राज्यपालांकडे केली.

    पुणे : ‘सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. जनतेला महागाईचे, दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत. पण, सरकार जनतेला कुठलीही मदत करताना दिसत नाही. या बेजबाबदार सरकारची योग्य ती दखल घेऊन यांना भानावर आणा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी राज्यपालांकडे केली. राज्यपालांनी राज्यातील सद्यस्थितीची गंभीर दखल घेतली नाही तर आगामी निवडणुकीत जनताच या सरकारला भानावर आणेल, असेही धंगेकर म्हणाले.

    काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र पाठवून राज्यातील दुष्काळाकडे, वाढत्या महागाईकडे, आरक्षणाच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे सांगितले. अशा अडचणीच्या काळात राज्यपालांनी हस्तक्षेप करून लोकांच्या प्रश्नांपासून पळ काढणाऱ्या सरकारला भानावर आणावे, अशी मागणीही केली.

    धंगेकर म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दिवसांपासून काँग्रेस पक्ष फोडण्याचे कट-कारस्थान रचण्यात आणि काँग्रेसचे आमदार पक्षात घेण्यात भाजप दंग आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षाच्या जाहीर सभा घेण्यात आणि आपला वाढदिवस साजरा करण्यात रमले आहेत. मात्र, राज्यात अनेक भागात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे.

    तसेच उन्हाळ्याच्या उंबरठ्यावरच पाणी टंचाईचे चटके बसू लागले आच्या चाऱ्याची चणचण जाणवत आहे. पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ ग्रामीण भागातील नागरिकांवर येत आहे.