वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे ही सामाजिक जबाबदारी :महादेव माळवदकर-पाटील

आजही समाजामध्ये आपणास आर्थिक दरी पाहावयास मिळते.  त्यासाठी शिक्षण हे मुख्य कारण आहे. समाजाचा पर्यायाने गावाचा, तालुक्याचा, राज्याचा व देश सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ही दरी कमी झाली पाहिजे. समाजातील शिक्षणापासून उपेक्षित, वंचित तसेच दुर्लक्षित व आर्थिक दृष्ट्या मागास घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे ही आपली सर्वांची सामाजिक बांधिलकी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती सहसचिव महादेवराव माळवदकर  यांनी काढले.

  जेजुरी : आजही समाजामध्ये आपणास आर्थिक दरी पाहावयास मिळते.  त्यासाठी शिक्षण हे मुख्य कारण आहे. समाजाचा पर्यायाने गावाचा, तालुक्याचा, राज्याचा व देश सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ही दरी कमी झाली पाहिजे. समाजातील शिक्षणापासून उपेक्षित, वंचित तसेच दुर्लक्षित व आर्थिक दृष्ट्या मागास घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे ही आपली सर्वांची सामाजिक बांधिलकी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती सहसचिव महादेवराव माळवदकर  यांनी काढले.

  महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी येथील पोस्ट ऑफिस शेजारील झोपडपट्टी येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी ९५ मुलांना वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, अंकलीपी, वॉटर बॅग व खाऊ इत्यादींचे वाटप करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, पुरंदर तालुका शिक्षक समितीचे माजी अध्यक्ष सुनील कुंजीर, पुरंदर तालुका शिक्षक पतसंस्थेचे संचालक सुनील कांबळे, सुरेश जगताप, सतीश कुंजीर, शिक्षक नेते सुनील जगताप, कुंडलिक कुंभार, प्रसिद्ध प्रमुख चांगदेव थिकोळे, दिलीप कांबळे, गोविंद लाखे इत्यादी उपस्थित होते.प्रास्ताविक गोविंद लाखे यांनी केले. सूत्रसंचालन कुंडलिक कुंभार यांनी तर आभार चांगदेव थिकोळे यांनी मानले.

  दुर्बलांचे शिक्षणात शोषण होऊ नये  
  शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हणतात. शिक्षण  अन्यायाविरुद्ध डरकाळी फोडल्याशिवाय राहत नाही. समाजामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल, वंचित घटकांचे  शिक्षणापासून  नेहमी शोषण होत असल्याचे चित्र आपणास पाहावयास मिळते. या सर्वांपासून त्यांची सुटका व्हावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी दलेल्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्रीचा अवलंब केला तर कोणताही समाज मागास  राहणार नाही व त्यांचे शोषण होणार नाही. या त्रिसूत्राची कास आपण धरली पाहिजे.

  या मेळाव्याचा मुख्य उद्देश शिक्षणाबद्दल उदासीन असलेल्या पालकांचे प्रबोधन करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे हाच आहे. समाजातील प्रत्येक घटकांनी त्याला प्रतिसाद द्यावा. या ज्ञानगंगेत सर्वांना सहभागी करून घ्यावे.

  - महादेव माळवदकर, सहसचिव, महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती.