सख्खा भाऊ पक्का वैरी, जमिनीच्या वादातून भावाच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला, तीन जण गंभीर जखमी

देवळा येथील मालेगाव रस्त्यावरील लोखंडे पॅलेस येथे शेतीच्या रस्त्याच्या वादातून शेतामध्ये सख्खा भाऊ संजय रतन लोखंडे त्याची पत्नी मनीषा, मुलगा सागर व प्रेम, यांनी फिर्यादी मांगु रतन लोखंडे व त्याची पत्नी कल्पना तसेच मुलगी माधुरी यांना आज बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

    देवळा : देवळा मालेगाव रस्त्यावरील लोखंडे पॅलेस येथे शेतीच्या रस्त्याच्या वादातून एकाने त्याचा सख्खा माजी सैनिक असलेला भाऊ, भावजय व पुतणीला बेदम मारहाण (Attack On Brothers Family) केली आहे. या घटनेबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. आरोपींना देवळा पोलिसांनी (Deola Police)  ताब्यात घेतले आहे. शेतीच्या रस्त्याच्या वादातून सख्ख्या भावाला बेदम मारहाण करण्यात आल्याच्या या घटनेवरून ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ अशी म्हणायची वेळ आली आहे.

    याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, देवळा येथील मालेगाव रस्त्यावरील लोखंडे पॅलेस येथे शेतीच्या रस्त्याच्या वादातून शेतामध्ये सख्खा भाऊ संजय रतन लोखंडे त्याची पत्नी मनीषा, मुलगा सागर व प्रेम, यांनी फिर्यादी मांगु रतन लोखंडे व त्याची पत्नी कल्पना तसेच मुलगी माधुरी यांना आज बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत मांगु लोखंडे, त्यांची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर देवळा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येऊन पुढील उपचारार्थ त्यांना नाशिक येथे देवळाली मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे.

    देवळा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांची तात्काळ घटनास्थळी धाव येऊन मारहाण करण्याऱ्या आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भादवी कलम 307, 326, 324, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सपोनि पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्योती गोसावी, सहायक फौजदार देवरे, पोलीस हवालदार निकम हे करीत आहेत.