Brother commits atrocities on minor sister! Incidents of atrocities on 2 minor girls in Rajapeth area

१४ वर्षीय मुलीला स्थानिक देसाई ले आऊट परिसर स्थित मुलींच्या सरकारी संरक्षण गृहात ठेवले आहे. तेथे राहत असताना मुलीने संरक्षण गृह अधीक्षकांना दिलेल्या माहिती नुसार तिच्या भावाने घरात तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला.

    अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली. राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे. बाल कल्याण समितीने १३ जून रोजी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राहणारी १४ वर्षीय (14 Years ) मुलीला स्थानिक देसाई ले आऊट (Desai Le Out) परिसर स्थित मुलींच्या सरकारी संरक्षण गृहात (Government Protection House) ठेवले आहे. तेथे राहत असताना मुलीने संरक्षण गृह अधीक्षकांना दिलेल्या माहिती नुसार तिच्या भावाने घरात तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला. त्यानंतर घरातून निघून गेल्याने तिला बाल कल्याण समितीने येथे पाठविले.

    या माहितीच्या आधारे राजापेठ पोलिसांनी तिच्या भावा विरोधात गुन्हा दाखल केला. त्याच प्रमाणे शंकर नगर स्थित एका खासगी रुग्णालयात एक महिला तिच्या १३ वर्षीय मुलीचा गर्भपात करण्याकरिता पोहोचली होती. इतक्या कमी वयातील मुलीला गर्भपात करण्यासाठी आणल्याने हॉस्पिटलकडून ( Hospital ) तातडीने राजापेठ पोलिसांना( Rajapeth Police ) माहिती देण्यात आली. पोलिसांनी चौकशी केली असता अज्ञात व्यक्तीने तिच्या मुलीसोबत जबरीने शारिरीक संबंध ठेवले होते. त्यामुळे मुलगी गर्भवती राहिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला.