
राज्यातील तब्बल 2 हजार 359 ग्रामपंचायतीचा निकाल समोर येत आहे. यामध्ये तेलंगणाच्या बिआरएस पक्षानं 10 ग्रामपंचायतींवर आपला झेंडा रोवल्याचं दिसून येत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पाऊल ठेवू पाहणाऱ्या तेलंगाणाच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाला यश आलं आहे. राज्यात काल तब्बल 2 हजार 359 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली. आता सगळ्या ग्रामपंचायतींचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांच्या बीआरएस पक्षाला महाराष्ट्रातील दहा ग्रामपंचायतीमध्ये झेंडा रोवण्यास यश आलं आहे. भंडाऱ्यातील नऊ ग्रामपंचायतीवर बीआरएस पक्षाने विजय मिळवला आहे. तर बीडमधील रेवती देवकी ग्रामपंचायतही ताब्यात घेतली आहे.
भंडाऱ्यातील नऊ ग्रामपंचायतीवर बीआरएसनं मिळवसा विजय
भंडारा जिल्ह्यातील ६६ पैकी २० ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. भंडाऱ्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीला पक्षाडत बीआरएस पक्षानं आतापर्यंत 9 ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावला आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षाला आतापर्यंत दोन दोन ग्रामपंचयतीमध्ये विजय मिळवता आलाय. तर राष्ट्रवादीला एका ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळला आहे.
बिडमध्येही बिआरएसनं मिळवला विजय
भंडारा प्रमाणे बीडमध्येही बीआरएस पक्षाने विजय मिळवला आहे. गेवराई तालुक्यातील रेवकी ग्रामपंचायतीवर बीआरएसने झंडा फडकावला आहे. शशिकला भगवान मस्के या विजयी झाल्या आहेत.