
आनंदनगर येथील जावेद खान पठाण याचा दारू विक्रीचा व्यवसाय आहे. बुधवारी रात्री ८ वाजता जावेद परिसरातील दुसऱ्या दारुविक्रेत्याकडे पोहचला. तेथे या दोघांमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने जावेदच्या पोटावर धारधार शस्त्राने वार केले.
वर्धा : जुन्या वादाच्या कारणातून एका दारू विक्रेत्याची निर्घूणपणे हत्या करण्यात आली. ही घटना बुधवार २२ जून रोजी सांयकाळच्या सुमारास शहरातील आनंदनगर भागात घडली. मृताचे नाव जावेद महबुब खान पठाण (वय ४०) रा. आनंदनगर वर्धा असे आहे.
पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आनंदनगर येथील जावेद खान पठाण याचा दारू विक्रीचा व्यवसाय आहे. बुधवारी रात्री ८ वाजता जावेद परिसरातील दुसऱ्या दारुविक्रेत्याकडे पोहचला. तेथे या दोघांमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने जावेदच्या पोटावर धारधार शस्त्राने वार केले. त्यामुळे जावेद जमिनीवर कोसळला. काही क्षणाताच त्याचा मृत्यू झाला.
ही घटना तडीपार असलेला आरोपी लियाकत याच्या घरी घडली. लियाकत हा तडीपार असूनही गेल्या काही दिवसांपासून तो शहरात असल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. या घटनेत तीन ते चार आरोपी असल्याची माहिती आहे. घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, शहर ठाण्याचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार आणि इतर पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. घटनेचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.