वृद्धाचे शीर कुऱ्हाडीने धडा वेगळे करून निर्घृण हत्या; जमिनीच्या वादातून माढ्यात घडला प्रकार

जमिनीचा वादातून शेवरे (ता.माढा) येथील वृद्धाचे शीर कुऱ्हाडीने धडा वेगळे करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.११) सकाळी घडली. संशयित आरोपी शीर सोबत घेऊन गेल्याने रात्री उशीरापर्यंत अंत्यसंस्कार करण्यात आले नव्हते. शंकर प्रल्हाद जाधव (वय ६५, शेवरे ता. माढा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

    टेंभुर्णी : जमिनीच्या वादातून शेवरे (ता.माढा) येथील वृद्धाचे शीर कुऱ्हाडीने धडा वेगळे करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.११) सकाळी घडली. संशयित आरोपी शीर सोबत घेऊन गेल्याने रात्री उशीरापर्यंत अंत्यसंस्कार करण्यात आले नव्हते. शंकर प्रल्हाद जाधव (वय ६५, शेवरे ता. माढा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

    शंकर प्रल्हाद जाधव व त्यांचे सावत्र भावांची मुले शिवाजी बाबासाहेब जाधव, परमेश्वर बाबासाहेब जाधव, आकाश बाबासाहेब जाधव, अजित बाबासाहेब जाधव यांचा (रा. कुरण वस्ती, शेवरे ता. माढा) यांचा वडोली (ता. माढा) हद्दीतील जमिनीबाबत दोन वर्षांपासून न्यायालयात वाद चालू आहे. शकंर जाधव यांचा मुलगा अमोल शंकर जाधव व इतर घरातील सर्व वडोली येथील शेतात काम करण्यासाठी गेले होते. काही दिवसांपूर्वी मयत शंकर जाधव यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्याने ते घरात एकटे झोपून होते.

    सकाळी साडेदहाच्या सुमारास संशयित आरोपी शिवाजी जाधव, परमेश्वर जाधव, आकाश जाधव, अजित जाधव यांनी शंकर जाधव यांच्या घरात घुसून शंकर जाधव यांना परमेश्वर, आकाश व अजित यांनी कुऱ्हाडीने मारहाण करून धरून ठेवले व शिवाजी जाधव याने त्याचा हातातील कुऱ्हाडीने शंकर जाधव यांच्या गळ्यावर वार करून शीर धडा वेगळे केले.