पालघरमधील बीएसएफ जवानाचा सर्प दंशाने पठाणकोटमध्ये मृत्यू

    पालघर : पालघर (palghar) जिल्ह्यातील विक्रमगड (Vikramgad) तालुक्यातील कऱ्हे गावचे सुपुत्र महेश रामा फडवळे (Mahesh Fadwale) या जवानाला वीरमरण आले आहे. पंजाबात पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत असणाऱ्या महेश रामा फडवळे यांना वीरमरण आले आहे. महेश रामा पडवले यांचे पार्थिव रात्री मुंबईत आणल्यानंतर आज (६ जून) त्यांच्यावर कऱ्हे या मूळगावी या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

    पठाणकोटमधील बीएसएफ (BSF)चे बीएन मुख्यालय ५८ माधोपूरजवळ थारियाल गावात महेश रामा फडवले हे २०१९ पासून राहत होते. ५ जून रोजी कर्तव्य बजावत असताना जवान महेश फडवळे यांच्या डाव्या हाताला सर्पदंश झाला. या घटनेची माहिती मिळताच एक रुग्णवाहिका आणि नर्सिंग असिस्टंट दाखल झाले. त्यानंतर महेश फडवळे यांना पठाणकोटच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तातडीने हलवण्यात आले. त्यानंतर याबाबत त्यांच्या पत्नी प्रमिला पडवले यांनी या प्रकरणाची माहिती देण्यात आली.

    पठाणकोटच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांच्या पश्चात वडील रामा फडवळे, आई रख्मी फडवळे, पत्नी प्रमिला फडवळे आणि मुलगी नॅन्सी फडवळे असा परिवार आहे.