BSP and Bhim Brigade's agitation against Agneepath! Strong demand to stop the contracting of the army

प्रधानमंत्र्यांच्या लष्करा बाबतच्या एका निर्णयामुळे तरुण हताश झाले आहे. खेड्यापाड्यातील गरीब तरूण सैन्यात दाखल होण्याचे स्वप्न बाळगतो. त्या युवकांचे स्वप्न हिरावून घेण्याचे काम प्रधानमंत्री मोदी यांनी केले आहे.

    अमरावती : केंद्र सरकार भारतीय लष्कराचे कंत्राटीकरण करीत असल्याचा आरोप करत बहुजन समाज पार्टी (Bahujan Samaj Party)आणि भीम ब्रिगेड (Bhim Briged) संघटनेच्या वतीने वेगवेगळे आंदोलन करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

    अग्निपथ योजनेला देशभरात विरोध होत आहे. तरुणांच्या भविष्याचा खेळखंडोबा करणारी ही योजना रद्द करून पूर्वीप्रमाणेच सैन्य भरती राबविण्याची मागणी करण्यात आली. इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भीम ब्रिगेडने ( Bhim Briged) दुचाकीवर रॅली काढत, काळे झेंडे दाखवून केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ (Agneepath)  योजनेचा निषेध केला. या योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात काम करता येणार आहे. या सैनिकांना अग्निवीर म्हणून संबोधिले जाईल. यातील फक्त २५ टक्के तरुणांनाच सेवेत कायम केले जाईल. त्यामुळे या योजनेला विरोध होत आहे.

    ही योजना भारतीय लष्कराचे खासगीकरण करणारी असल्याचे भीम ब्रिगेडचे (Bhim Briged) म्हणणे आहे. त्यामुळे या योजनेच्या निषेधार्थ इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काळे झेंड दाखवीत निषेध रॅली(Rally) भीम ब्रिगेडने (Bhim Briged) काढली. ही योजना तातडीने रद्द करून नियमित सैन्य भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी विक्रम तसरे, प्रवीण मोहोड, गौतम सवई, शरद वाकोडे, उमेश कांबळे, रूपेश तायडे, नितीन काळेंसह मोठ्या संख्येने सैन्य भरतीची तयारी करणारे युवक सहभागी झाले होते.

    बीएसपीने (BSP) काढला आक्रोश मोर्चा

    प्रधानमंत्र्यांच्या लष्करा बाबतच्या एका निर्णयामुळे तरुण हताश झाले आहे. खेड्यापाड्यातील गरीब तरूण सैन्यात दाखल होण्याचे स्वप्न बाळगतो. त्या युवकांचे स्वप्न हिरावून घेण्याचे काम प्रधानमंत्री मोदी यांनी केले आहे. त्यामुळे चार वर्षाच्या अग्निपथ (Agneepath) योजनेच्या निषेधार्थ बहुजन समाजपार्टीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला असल्याचे बसप प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजणे यांनी सांगितले. तरूणांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न बंद करा आणि घोषित केलेली अग्निपथ योजना तत्काळ मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. बहुजन समाज पार्टीच्या वतीने (Bahujan Samaj Party) राज्यातील पहिले आंदोलन या विरोध अमरावतीत करण्यात आले असून उर्वरित जिल्ह्यातही असेच आंदोलन करण्यात येणार असल्याचे ताजणे यांनी सांगितले. आंदोलनात बसपचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजणे, सुनिल डोंगरे, चेतन पवार, दिपक धुरंधर, सुदाम बोरकर, अजय गोंडाणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व तरूणांचा सहभाग होता.