वडगावात विजेचा शॉक लागून म्हशीचा मृत्यू

वडगाव मावळ (Vadgaon Maval) नगरपंचायत हद्दीमध्ये विजेच्या खांबानजीक ताण दिलेल्या वीजवहिनीच्या खाली पडलेल्या वीज वाहक तारेचा शाॅक लागून म्हशीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार (दि.११) सकाळीच्या सुमारास केशवनगर परिसरात घडली.

    वडगाव मावळ : वडगाव मावळ (Vadgaon Maval) नगरपंचायत हद्दीमध्ये विजेच्या खांबानजीक ताण दिलेल्या वीजवहिनीच्या खाली पडलेल्या वीज वाहक तारेचा शाॅक लागून म्हशीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार (दि.११) सकाळीच्या सुमारास केशवनगर परिसरात घडली.

    दिनेश गोविंद ढोरे यांची दुभती म्हैस वडगाव कातवी साखळी रस्त्या लगत असलेल्या मोकळ्या रानात चरत असताना वीज वाहिनीच्या खाली पडलेल्या तारेचा स्पर्श झाल्याने म्हैस जागीच ठार झाली. ही घटना नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला.

    वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. विद्युत मंडळाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दूध विक्री करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवणारे ढोरे यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.