कास पठारावर हवाई पट्टी उभारा; उदयनराजेंची ज्योतिरादित्य शिंदेंकडे मागणी

सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर, पाचगणी व जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेले कास पठार येथे महाराष्ट्रातील 35 ते 40 लाख पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कास पठार परिसरात छोटी हवाई पट्टी उभारण्यासंदर्भात केंद्राच्या विमान उड्डाण मंत्रालयाने पुढाकार घ्यावा.

    सातारा : सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर, पाचगणी व जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेले कास पठार येथे महाराष्ट्रातील 35 ते 40 लाख पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कास पठार परिसरात छोटी हवाई पट्टी उभारण्यासंदर्भात केंद्राच्या विमान उड्डाण मंत्रालयाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांच्याकडे केली.

    कास पठार येथे छोटी हवाई पट्टी उभारण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही ज्योतिरादित्य शिंदे यांनी चर्चेनंतर दिली आहे. सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक स्थळांचा आणि पर्यटनाचा वारसा लाभला आहे. महाबळेश्वर, पाचगणी कास येथे 35 ते 40 लाख पर्यटक दरवर्षी भेट देतात. यामध्ये गतिमानता आणण्यासाठी कास पठार परिसरात योग्य जागा शोधून तेथे एक छोटी हवाई पट्टी उभारण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. याची लवकरच तज्ञांच्या पथकाद्वारे पाहणी करून तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले.