नाल्याचे अवैधरित्या अरुंदीकरण करणाऱ्या बिल्डरला प्रशासनाकडून अभय ; धुळे येथील प्रकार

धुळे येथे चितोड परिसर अजळकर नगर - योगी नगरच्या समोर असणार्‍या स्वामी समर्थ नगरच्या बिल्डरने प्रशासनाची परवानगी न घेता मोती नाल्यावर परिसरातील नागरीकांच्या हरकती झुगारून अवैध पाईप मोरी बांधली भराव करून नाला अरुंद केला.

    धुळे येथे चितोड परिसर अजळकर नगर – योगी नगरच्या समोर असणार्‍या स्वामी समर्थ नगरच्या बिल्डरने प्रशासनाची परवानगी न घेता मोती नाल्यावर परिसरातील नागरीकांच्या हरकती झुगारून अवैध पाईप मोरी बांधली भराव करून नाला अरुंद केला. १८ -१९ सप्टेंबरच्या रात्री आलेल्या पुराचे पाणी या अवैध पाईप मोरीमुळे तुंबले व परिसरात पसरले.

    पाणी अडल्यामुळे ही अवैध पाईप मोरी देखील वाहून गेली. वीज मंडळाची हाय टेन्शन लाईन पोल पडल्याने धोकादायकरित्या खाली पडली. कलेक्टर – मनपा आयुक्तांकडे नागरिकांच्या तीन महिन्यां पासून लेखी तक्रारी याबाबत आल्या आहेत. याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र ढिम्म प्रशासनाने याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले आहे. या अवैध बांधकामाने धोकेदायक स्थिती निर्माण केल्याबद्दल दोषींच्या विरोधात जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त काय करतात याकडे आता नागरिकांचे लक्ष आहे.