डोंबिवली अहिरे भागातील तीन मजली इमारत कोसळली; दोन जण अडकल्याची भीती

  मुंबई : डोंबिवलीमध्ये एक तीन मजल्यांची इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या इमारतीखाली तीन जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

   

  तीन मजली इमारत कोसळली

  डोंबिवलीतल्या न्यू अहिरे रस्त्यावरील तीन मजली इमारत कोसळली आहे. गुरुवारी या इमारतीला तडे गेलेले होते. महानगरपालिकेने इमारत धोकादायक ठरवून रहिवाशांना नोटिसाही दिलेल्या होत्या.

  शुक्रवारी ही इमारत कोसळली

  त्यामुळे इमारत रिकामी करण्यात आलेली होती. शेवटी शुक्रवारी ही इमारत कोसळलीच. या इमारतीमध्ये दोघे जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मलबा हटवण्याचं काम सुरु आहे.

  सदरील इमारतीचं नाव अधिनारायण असल्याचं सांगितलं जातंय. दुर्घटनेनंतर महानगर पालिकेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत.