धक्कादायक – नेरुळमध्ये इमारत कोसळली, बचावकार्य सुरु

नेरूळ परिसरातील जिमी पार्क नावाच्या (Building Collapsed In Navi Mumbai) इमारतीचा संपूर्ण भाग कोसळल्याची माहिती मिळाली आहे.

    नवी मुंबई : नेरूळमध्ये (Building Collapsed In Nerul) एक इमारत कोसळली आहे. नेरूळ परिसरातील सेक्टर १७ मधील जिमी पार्क नावाच्या इमारतीचा संपूर्ण भाग कोसळल्याची माहिती मिळाली आहे. (Navi Mumbai Building Collapsed) या घटनेत ७ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. इमारतीत १२ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव पथकाकडून बचावकार्य सुरू आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या सहाव्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला. या इमारतीत ड्रिलिंगचं काम सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर (Abhijeet Bangar) यांनी सांगितलं की, या इमारतीचा वरचा भाग कोसळला. एकूण ७ जणांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. नेरुळ, कोपरखैरणे आणि वाशी अग्नीशमन केंद्रातील जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.