बुलीबाई अ‍ॅप प्रकरण : आरोपींच्या जामीन अर्जाला पोलिसांचा आक्षेप; वांद्रे दंडाधिकारी न्यायालय गुरुवारी फैसला सुनावणार

बुलीबाई या अ‍ॅपच्या (BulliBai App Case) माध्यमातून मुस्लिमांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरून मुस्लिम महिलांचे फोटो आणि त्यांची माहिती अपलोड करण्याचे काम सुरू होते. महिलांच्या ट्विटवर, इन्स्टाग्राम आणि फेबसुकवरुन माहिती घेत आणि त्यांचे फोटो चोरी करत टाकण्यात आले असून अशा १०० हून अधिक महिलांचे फोटो टाकून त्यांच्यावर बोली लावण्यात येत असल्याचे समोर आले.

    मुंबई : बुलीबाई या अ‍ॅपच्या (BulliBai App Case) माध्यमातून महिलांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिनही आरोपींच्या जामीन अर्जाला मुंबई पोलिसांकडून आक्षेप घेण्यात आला. तसेच आरोपी विशाल कुमार झाची चौकशी करण्यासाठी कोठडी आवश्यक असल्याचे सांगतिले. त्यांची बाजू ऐकून दंडाधिकारी न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला.

    बुलीबाई या अ‍ॅपच्या (BulliBai App Case) माध्यमातून मुस्लिमांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरून मुस्लिम महिलांचे फोटो आणि त्यांची माहिती अपलोड करण्याचे काम सुरू होते. महिलांच्या ट्विटवर, इन्स्टाग्राम आणि फेबसुकवरुन माहिती घेत आणि त्यांचे फोटो चोरी करत टाकण्यात आले असून अशा १०० हून अधिक महिलांचे फोटो टाकून त्यांच्यावर बोली लावण्यात येत असल्याचे समोर आले. त्याविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एफआयआर दाखल केली. त्यानंतर प्रथम विशाल कुमार झा आणि ५ जानेवारी रोजी उत्तराखंडमधून श्वेता सिंह आणि मयंक रावत या दोघानाही ताब्यात घेण्यात आले. तिघांनीही दाखल केलेल्या जामीन अर्जावर वांद्रे येथील दंडादिकारी न्यायालयात मंगळवारी सुनावणी पार पडली.

    कोविडच्या संसर्गामधून बरे झाल्यानंतर विशाल झाला रविवारी आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आले आहे. श्वेता सिंग (१८) ही दुसरी आरोपी सध्या भायखळा महिला कारागृहात असून तिसरा आरोपी मयंक रावत (२१) कोरोनाची लागण झाल्यानंतर कलिना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. मंगळवारी सरकारी वकिलांनी तिघाच्याही जामीन अर्जावर आक्षेप घेतला.

    जाणीवपूर्वक अनेक ट्विटर खात्यांद्वारे बनावट ओळख वापरून त्यांनी दोन समुदायांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आणि ओळख लपवताना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी प्रोटॉन मेलचा वापर केला. या ॲपचा निर्माता निरज बिश्नोईला लवकरच ताब्यात घेणार आहोत त्यानंतर झा आणि बिश्नोई दोघांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहितीही मुंबई पोलिसांनी न्यायालयाला दिली. त्यांची बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने अर्जावरील आपला निकाल गुरुवारी जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले.