पट्टेरी वाघाच्या हल्ल्यात बैल ठार! महिनाभरातील दुसरी घटना 

आजरा तालुक्यातील  आवंडी धनगरवाडा क्रमांक तीन येथे वाघाने पुन्हा एकदा बैलावर हल्ला केल्याने या हल्ल्यात धोंडीबा धुळू कोकरे यांचा बैल ठार झाला आहे. शनिवारी सायंकाळी सदर घटना घडली. वाघाच्या हल्ल्यात दीड महिन्यात दोन बैल ठार झाले आहेत. पट्टेरी वाघाच्या सततच्या हल्ल्यामुळे परिसरात घबराहट पसरली आहे .     

    उत्तूर :आजरा तालुक्यातील  आवंडी धनगरवाडा क्रमांक तीन येथे वाघाने पुन्हा एकदा बैलावर हल्ला केल्याने या हल्ल्यात धोंडीबा धुळू कोकरे यांचा बैल ठार झाला आहे. शनिवारी सायंकाळी सदर घटना घडली. वाघाच्या हल्ल्यात दीड महिन्यात दोन बैल ठार झाले आहेत. पट्टेरी वाघाच्या सततच्या हल्ल्यामुळे परिसरात घबराहट पसरली आहे .

    अधिक माहिती अशी , आवंडी धनगर वाडा महिन्यापूर्वी सोनू बाबू कोकरे यांचा बैल वाघाच्या हल्ल्यात ठार झाला होता. शनिवारी  धोंडीबा कोकरे यांच्या  जंगलाशेजारी असणाऱ्या शेताजवळ चरणाऱ्या बैलावर वाघाने हल्ला केला. यामध्ये बैल गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत बैलाला घरी आणण्यात आले. परंतु त्याचे निधन झाले. वनविभागाकडून सदर हल्ला हा पट्टेरी वाघाचा असल्याचे सांगण्यात आले.