शिवसेना नेत्याच्या रिसॉर्टवर बुलडोझर फिरणार; पर्यावरण विभागाने मागवल्या निविदा

चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निविदेमध्ये २२ सप्टेंबरपर्यंत रिसॉर्ट पाडण्यासाठी कंत्राटदारांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या काही महिन्यांपासून अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्ट प्रकरण लावून धरले होते. त्याबाबत अखेर पर्यावरण मंत्रालयाकडून कारवाई करण्यात येत आहे.

    मुंबई : शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या दापोलीतील (Dapoli) साई रिसॉर्टवर (Sai Resort) लवकरच कारवाई होणार, असे ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Sommaiya) यांनी केले होते. आज या दोन याचिकांवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. तसेच, पर्यावरण विभागाकडून (Environment Department) बांधकामातील अनियमिततेप्रकरणी (Irregularities In Construction) रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत.

    चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निविदेमध्ये २२ सप्टेंबरपर्यंत रिसॉर्ट पाडण्यासाठी कंत्राटदारांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या काही महिन्यांपासून अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्ट प्रकरण लावून धरले होते. त्याबाबत अखेर पर्यावरण मंत्रालयाकडून कारवाई करण्यात येत आहे.

    अनिल परब यांनी २०१७ मध्ये दापोली जवळ जमीन विकत घेतली. मात्र त्याचे रजिस्ट्रेशन दोन वर्षानंतर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही शेतजमीन असून सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने ती नॉन अॅग्रीकल्चर करण्यात आली आहे. रिसॉर्टचे बांधकाम करताना सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याचाही आरोप अनिल परब यांच्यावर करण्यात आला आहे. मुरूड ग्रामपंचायतीने ही गोष्ट मान्य केली आहे, असा दावा पर्यावरण मंत्रालयाने केला आहे.