devendra fadnavis

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभरात तिरंगा रॅली, अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. याच निमित्ताने वर्धा याठिकाणी देखील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या तिरंगा रॅलीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला.

    नागपूर – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त वर्धा येथे भाजपने काढलेल्या तिरंगा यात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलेट स्वारी केली. मात्र, या गाडीला नंबर प्लेट नसल्याचे समोर आले आहे. वाहतूक पोलिस आता उपमुख्यमंत्र्यांना दंड ठोठावणार की, कायदा फक्त सर्वसामान्यांसाठी राहणार, अशी चर्चा सुरू झालीय.

    भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभरात तिरंगा रॅली, अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. याच निमित्ताने वर्धा याठिकाणी देखील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या तिरंगा रॅलीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला. चरखा भवन ते आर्वी नाकापर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली. या बुलेट स्वारीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

    सेवाग्राम येथील चरखा भवनात जिल्हा प्रशासनाकडून आयोजित स्वातंत्रच्या अमृत महोत्सवच्या कार्यकर्मात सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. या कार्यक्रमानंतर भाजपाच्या वतीने हुतात्मा स्मारक ते वर्धेच्या आर्वी नाका पर्यंत तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. हिरवी झेंडी दाखवल्यावर स्वतः फडणवीस यांनी बुलेटवर स्वार होत काही अंतरापर्यंत सहभाग घेतला. मात्र, या गाडीला नंबर प्लेटच नव्हती. त्यामुळे त्यांना वाहतूक पोलिस दंड ठोठावणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.