बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन पंढरीनाथ फडके यांचे निधन, कारमध्ये आला हृदयविकाराचा झटका

बैलगाडा प्रेमी म्हणून सर्वदूर ख्याती पसरलेले आणि गोल्डमॅन म्हणून गाजलेले पंढरीनाथ फडके यांचे निधन झाले आहे. वडिलांच्या काळापासून त्यांना बैलगाड्याची आवड होती. पंढरीनाथ फडके हे मुळचे पनवेल येथील विहिघर गावातील राहणार होते.

    पनवेल : बैलगाडा प्रेमी म्हणून सर्वदूर ख्याती पसरलेले आणि गोल्डमॅन म्हणून गाजलेले पंढरीनाथ फडके यांचे निधन झाले आहे. वडिलांच्या काळापासून त्यांना बैलगाड्याची आवड होती. पंढरीनाथ फडके हे मुळचे पनवेल येथील विहिघर गावातील राहणार होते. त्यांनी आपली आवड जोपासत महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक अशी ओळख निर्माण केली. राज्यातील बैलगाडा शर्यतीला मोठ्या स्तरावर नेण्यामध्ये आणि ग्लॅमर देण्यामध्ये पंढरीनाथ फडके यांचे मोलाचे योगदान होते.

    महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांनी तरुणांमध्ये पारंपारिक बैलगाडा शर्यतीचे आकर्षण निर्माण केले. त्यांनी बैलगाडा प्रेमींचा मोठा वर्ग निर्माण केला. त्याचबरोबर किलोभर सोने अंगावर घेऊन मिरवणाऱ्या पंढरी शेठ फडके यांना गोल्डमॅन म्हणून ओळखले जात होते. बैलगाडा शर्यत बंद झाल्यानंतर त्यांनी अथक प्रयत्न केले. शर्यत पुन्हा सुरु व्हावी यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. पंढरीनाथ फडके यांच्याकडे आता देखील 40-50 शर्यतीचे बैल दावणीला आहेत. बैलगाडा शर्यतीमधील सर्वात जास्त शर्यत जिंकलेला आणि सर्वात नामांकित ‘बादल’ बैल ही त्यांच्याकडे आहे.

    पंढरीनाथ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. 1986 पासून ते बैलगाडा शर्यतीचा नाद लागला. बैलगाडा शर्यतीतून अमाप पैसा कमावला. आज दुपारी पंढरीनाथ फडके यांना कारमध्ये आला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.