शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची पुन्हा दादागिरी; प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर, काय आहेत बांगर आणि वाद?, वाचा…

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य (Principal) अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर शिवीगाळ करत मारहाण केली आहे. आमदार संतोष बांगरच नाही तर बांगर यांचे कार्यकर्ते सुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. संजय बांगर वादांमुळे कायमच चर्चेत असतात.

    हिंगोली : शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) हे कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन किंवा वादग्रस्त विधानावरुन सतत चर्चेत असतात. तसेच त्यांच्या कृत्यामुळं किंवा दादागिरीमुळं अनेकवेळ वादात सापडले आहेत. आता पुन्हा एकदा संतोष बांगर यांची दादागिरी केल्याचा एक व्हीडिओ समोर आला असून, यात बांगर यांनी काँलेजच्या प्राचार्यांच्या (Collage Principal) कानाखाली मारल्याचा व्हीडिओ समोर आला आहे. त्यामुळं संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली असून, बांगर यांच्यावर कारवाईची मागणी विरोधकांनी केली आहे.

    दरम्यान, हिंगोली (Hingoli) शहरालगत असल्यास शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य (Principal) अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर शिवीगाळ करत मारहाण केली आहे. आमदार संतोष बांगरच नाही तर बांगर यांचे कार्यकर्ते सुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. संजय बांगर वादांमुळे कायमच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी संतोष बांगर यांनी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली होती. 27 ऑक्टोबर रोजी आमदार संतोष बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह गार्डन गेटवरुन मंत्रालयात जात होते. त्यांच्यासोबत 15 कार्यकर्ते देखील होते. मात्र याचवेळी गेटवर ड्युटीला असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने पासबाबत विचारपूस केल्याने आमदार बांगर यांनी त्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली होती.

    हिंगोलीतील प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हीडिओ हा दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच सध्या हा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे. तसेच यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, यावर्षी ८ जानेवारी रोजी हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई इथल्या मसाई मातेची यात्रेत राजकीय पुढाऱ्यांना बंदी असतानाही आमदार बांगर यात्रेत पोहोचले, यावर गावकऱ्यांनी आक्षेप घेत, त्यांचा अडवला ताफा अडवला होता.

    आमदार बांगर आणि वाद! 

    • 26 जून 2022 शिवसेनेतील बंडांनंतर वादग्रस्त वक्तव्य
    • शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांची मुलं अविवाहित मरतील असं वक्तव्य
    • 17 जुलै 2022 रोजी गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा, असं वक्तव्य
    • 15 ऑगस्ट 2022 रोजी माध्यान्ह भोजन योजनेत जेवण पुरवणाऱ्या गोडाऊन व्यवस्थापकाला मारहाण
    • 14 ऑक्टोबर 2022 रोजी विमान कंपनी कार्यालयात तोडफोड, कृषी अधिकाऱ्याला धमकावलं.
    • 27 ऑक्टोबर 2022 रोजी पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप
    • आता प्राचार्याला कार्यकर्त्यांसह मारहाण