महिला आर्थिक विकास महामंडळाला दणका; अध्यक्षांची नियुक्ती रद्द

महिला आयोग पदाचे अध्यक्षपद हे घटनात्मक पद असल्याने आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हे पद सोडण्यास नकार दिल्याने सर्वच पदे रद्द करणे शिंदे - फडणवीस सरकारसाठी अडचणीचे झाले आहे. महाविकास आघाडीच्या अगोदरही भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत असताना २०१८ पासून ज्योती ठाकरे या अध्यक्ष पदावर होत्या. शिंदे-फडणवीस सरकारकडून विशेष करून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या विविध प्राधिकरणावरील नियुक्त्या रद्द केल्या जात आहेत.

    मुंबई : महाविकास आघाडीने (MVA) केलेल्या नियुक्त्या रद्द (Cancellation Appointment) करण्यात येत आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (Mahila Aarthik Vikas Mahamandal) अध्यक्षा ज्योती ठाकरे (Jyoti Thackeray) यांची नियुक्ती रद्द करण्यात आली असल्याचे आदेश आज महिला व बालकल्याण विभागाने दिले आहेत.

    महिला आयोग (Women Commission) पदाचे अध्यक्षपद हे घटनात्मक पद असल्याने आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी हे पद सोडण्यास नकार दिल्याने सर्वच पदे रद्द करणे शिंदे – फडणवीस सरकारसाठी अडचणीचे झाले आहे.

    महाविकास आघाडीच्या अगोदरही भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत असताना २०१८ पासून ज्योती ठाकरे या अध्यक्ष पदावर होत्या. शिंदे-फडणवीस सरकारकडून विशेष करून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या विविध प्राधिकरणावरील नियुक्त्या रद्द केल्या जात आहेत. महाविकास आघाडीमध्ये महिला व बालकल्याण विभाग काँग्रेसकडे होता. पक्षाच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडे मंत्रिपद होते. तर महिला आर्थिक विकास महामंडळ शिवसेनेकडे होते, ज्योती ठाकरे यांच्याकडे ‘मआविम’चे अध्यक्षपद होते ते आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवसेनेने कायम ठेवले होते. पण नवनिर्वाचित सरकारने ही नियुक्ती रद्द केली आहे. त्यांना ३ वर्षे ११ महिन्यांपर्यंत ‘मआविम’चे अध्यपद भूषविता आले. महाविकास आघाडीचे सरकार अचानक कोसळल्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारकडून आघाडी सरकारच्या विविध निर्णयांना स्थगितीही दिली जात आहे.