घरफोडी करणारी टोळी गजाआड, २१ तोळे सोने जप्त; लोणंद पोलिसांची कामगिरी

लोणंद, (Lonand) (ता. खंडाळा) गावच्या (Village) हद्दीतील बाजारतळ येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा लोणंद पोलिसांनी(Police) उघडकीस आणून चोरीस गेलेला २१ तोळे सोन्याचा मुद्देमाल चोर व चोरीचा माल विकत घेणाऱ्या सोनाराकडून जप्त केला आहे.

    सातारा : लोणंद, (Lonand) (ता. खंडाळा) गावच्या (Village) हद्दीतील बाजारतळ येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा लोणंद पोलिसांनी(Police) उघडकीस आणून चोरीस गेलेला २१ तोळे सोन्याचा मुद्देमाल चोर व चोरीचा माल विकत घेणाऱ्या सोनाराकडून जप्त केला आहे.

    या प्रकरणी महेश किरण चव्हाण (वय २७ रा. जामदारमळा, ता. श्रीगोंंदा, जि. अहमदनगर), मंदार चंद्रकांत पारखी (वय ४१ रा. शुक्रवार पेठ, सातारा), शाहरूख गुलामुर्तजा शेख (वय ३० रा. शनिवार पेठ, सातारा), श्रीधर प्रकाश मानेे (वय ३३ रा. राधिका रोड, सातारा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ५ जुलै २०२१ रोजी लोणंद येथील बाजारतळ येथे मध्यरात्री घरफोडी झाली होती. या घरफोडीचा तपास करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर यांना दिल्या होत्या.

    सुमारे ७ लाख ५६ हजारांचा माल हस्तगत

    लोणंद पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने कौशल्यपूर्ण तपास करून चोरी करणाऱ्या व चोरीचा माल विकत घेणाऱ्या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात सपोनि विशाल वायकर व त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले आहे. त्यांनी चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी सुमारे ७ लाख ५६ हजार रुपये किंमतीचे २१ तोळे सोन्याचे दागिने चौरांकडून हस्तगत केले.

    ही कारवाई सपोनी विशाल वायकर, विजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, स्वाती पवार, पोलीस अंमलदार महेश सपकाळ, अविनाश नलवडे, श्रीनाथ कदम, सर्जेराव सूळ, फैयाज शेख, विठ्ठल काळे, अवधूत धुमाळ, अभिजीत घनवट, मोहन नाचन व राजू कुंभार यांनी केली. या सर्वांचे जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी अभिनंदन केले.