महाबळेश्वर येथील घरफोडीचा गुन्हा उघड; एक लाख ६६ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

महाबळेश्वर (Mahabaleshear) येथे दिनांक १० जानेवारी २०२३ रोजी घरफोडीचा गुन्हा (Crime) घडला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने वेगवान तपास करून तिघांना ताब्यात घेतले.

    महाबळेश्वर : महाबळेश्वर (Mahabaleshear) येथे दिनांक १० जानेवारी २०२३ रोजी घरफोडीचा गुन्हा (Crime) घडला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने वेगवान तपास करून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रवीण चंद्रकांत घाडगे (रा. एरंडोल, तालुका महाबळेश्वर, सध्या राहणार संगमनगर, सातारा), अनिकेत वसंत पाटणकर (चंदननगर, कोडोली), आकाश ज्ञानेश्वर कापले (दत्तनगर कोडोली) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    चोरट्यांनी दोन लाख २८ हजार रुपये किमतीचे पॉलीकॅब वायर कटरमशीन, ड्रिल मशीन, ॲल्युमिनियम व प्लंबिंग साहित्य चोरून नेले होते. त्यानुसार महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक करून देवकर यांनी तपास गतिमान केला. देवकर यांना १९ जानेवारी रोजी बातमीदारामार्फत संबंधित आरोपी देगाव फाटा येथे आले असल्याची माहिती मिळाली.

    या कारवाईमध्ये संतोष पवार, रविंद्र मोरे, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, उत्तम दबडे, तानाजी माने, आदेश गाडगे, संजय शेडगे, विजय कांबळे, विश्वनाथ सपकाळ, अजित करणे, प्रवीण कांबळे, शिवाजी भिसे, स्वप्निल माने, अमोल माने, प्रवीण पवार, केतन शिंदे यांनी सहभाग घेतला होता.

    पिकअप व्हॅनसह दाेघे ताब्यात

    पोलीस पथकांनी देगाव फाटा येथे जाऊन दोन इसमांना पिकअप व्हॅन सह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तालुक्यात बाहेर कटर मशीन, ड्रिल मशीन, ॲल्युमिनियम व प्लंबिंग साहित्य इत्यादी साहित्य ताब्यात घेण्यात आले. चोरी केलेला माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा मिळून पाच लाख ६६ हजार ५९०रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप भागवत करत आहेत.