पुण्यात घरफोड्यांचे सत्र सुरुचं; मॉडेल कॉलनीतील बंद फ्लॅट फोडला, पाच लाखांचा ऐवज लंपास

पुणे शहरात (Pune City) घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला असून, मॉडेल कॉलनीतील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी ४ लाख ८० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी ६४ वर्षीय व्यक्तीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून, चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी केली आहे. 

    पुणे : पुणे शहरात (Pune City) घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला असून, मॉडेल कॉलनीतील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी ४ लाख ८० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी ६४ वर्षीय व्यक्तीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून, चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी केली आहे.

    तक्रारदार हे काही कामानिमित्त सोलापूर येथे गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, बेडरूममधील कपाटातून रोकड व दागिने असा एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, सीसीटीव्ही पडताळले आहेत. त्यानूसार चोरट्यांचा माग काढला जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.