घरफोड्यांचं सत्र सुरुचं; दोन ठिकाणच्या घरफोडीत १ लाख ६२ हजारांच्या ऐवजाची चोरी

सातारा शहरातील दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडींमध्ये १ लाख ६२ हजारांच्या ऐवजाची चोरी झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.

    सातारा : सातारा शहरातील दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडींमध्ये १ लाख ६२ हजारांच्या ऐवजाची चोरी झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत. सातार्‍यातील फुटका तलाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. घरातून चोरट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची कानातली फुले, असा एकूण ९२ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी केला. ही घटना दि. १ डिसेंबर रोजी घडली असून, याप्रकरणी अर्चना शामसिंह राजपूत (रा. सोमवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    दुसरी घटना शनिवार पेठेत घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरातून रोख ५० हजार रुपये, सोन्याचे कानातले, सोन्याचे वेडणे असा एकूण ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. ही घटना दि. २७ नोव्हेबर ते २ डिसेंबर या कालावधीत घडली असून याप्रकरणी आकाश चंद्रकांत मोहिते (वय ३२, रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.