वैतरणा धरण परिसरात सापडला होता जळालेला मृतदेह, कसा झाला हत्येचा उलगडा? : जाणून घ्या सविस्तर

नाशिक ते वैतरणा डॅम या ठिकाणी एका व्यक्तीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता त्याची कुणीतरी हत्या केली असल्याचा संशय पोलिसांना होता त्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली या घटनेचा उलगडा केला आहे.

    नाशिक : नाशिक ते वैतरणा डॅम या ठिकाणी एका व्यक्तीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता त्याची कुणीतरी हत्या केली असल्याचा संशय पोलिसांना होता त्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली या घटनेचा उलगडा केला आहे.

    नाशिकच्या वडगाव या ठिकाणी राहणाऱ्या मुजाहिद उर्फ गोल्डन खान याचा हा मृतदेह असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाला गती देत तिघा संशयितांना अटक केली आहे.

    दरम्यान रामेश्वर राम मोतीराम गर्दे, सलमान खान ऊर्फ माम्या वजीर खान, सदाशिव तानाजी गायकवाड असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नाव आहे, या तिघांनी त्यांच्या एका साथीदारासोबत मुजाहिद याला मुंबई आग्रा महामागरावरील मुंढे गाव या ठिकाणी गेले होते. त्यावेळी त्यांचात वाद झाला यावेळी या तिघा संशयित आणि त्यांच्या एका साथीदाराने मिळून मुजाहिद याच्यावर धार धार शस्त्राने वार करून त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने वैतरणा डॅम परिसरात एका पांढऱ्या कुणी त्याचा मृतदेह आढळला होता असे पोलीस तपासात समोर आले आहे.