एसटीतील घंटी वाजवायच्या दोरीने गळफास घेत बस ड्रायव्हरची आत्महत्या!

मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकातील कार्यरत असणारे हिरामण देवरे यांनी एसटी बसमध्येच आत्महत्या केली. त्यांनी एसटी बसमधील घंटी वाजवण्याच्या दोरीने स्वतःला बसमध्येच गळफास लावून घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली.

    धुळे : धुळ्यात एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एसटी बसस्थानकात एका बस चालकाने घंटी वाजवायच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या (ST Driver Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात एकाच खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकातील कार्यरत असणारे हिरामण देवरे यांनी एसटी बसमध्येच आत्महत्या केली. त्यांनी एसटी बसमधील घंटी वाजवण्याच्या दोरीने स्वतःला बसमध्येच गळफास लावून घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली. यानंतर एसटी बस स्थानकात एकच खळबळ उजाली. पुणे-धुळे बसमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

    यानंतर तातडीनं पोलिसांना (Dhule Suicide News) याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी या घटनेती गंभीर दखल घेत लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि बसमधील मृतदेह ताब्यात घेत अधिक तपास सुरु केला. त्याचप्रमाणे एसटी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानंतर आत्महत्या केलेली व्यक्ती एसटी बसचा चालक होती, हेही स्पष्ट झालं. त्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. आत्महत्येची ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण बस स्थानकात पसरल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, सध्या पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.