By Ajit Dad's get appeciation of world famous 10 year old satar player Soumya

तिला गोल्डन गर्ल म्हणून संबोधण्यात आले असून तिने अनेक सुवर्णपदके आणि पुरस्कार मिळवले आहेत. या आधीही शालेय शिक्षणमंत्र्यांनी तिचा अतुलनीय अभ्यासक म्हणून गौरव केला तर, बालविकास मंत्र्यांनी तिचा एक असामान्य कलाकार म्हणून गौरव केला आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्याचे तंत्र व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुरस्कार प्रदान करून गौरव केला.

    अकोला : महानगरातील सतार कलेत जागतिक स्तरावर ख्यातिप्राप्त १० वर्षीय बालिका सौम्या गुप्ता हिच्या सतार कलेबद्दल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्याचे तंत्र व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुरस्कार प्रदान करून गौरव केला. सौम्याने आपले गुरु व पिता डॉ. अभिनंदन गुप्ता यांच्या प्रोत्साहन व थोरांच्या आशीर्वाद मुळेच आपण हे करू शकलो असल्याची भावना व्यक्त केली.

    उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी बालिका सोम्या अभिनंदन गुप्ताला पुष्पगुच्छ, शाल व सन्मान पत्र देऊन सन्मानित केले. त्याच प्रमाणे तंत्र व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तिला उत्कृष्ट साधिका पुरस्कार प्रदान करून तिचा सन्मान केला. मुंबईतील पाटकर भवनात आयोजित या सोहळ्यात बालिका सौम्या, तिचे गुरू व वडील अभिनंदन गुप्ता, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, तंत्रशिक्षण संचालक, रजिस्ट्रार व विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी, प्राध्यापक व पाच हजर नागरिक उपस्थित होते. यावेळी सौम्याने आपली कला सादर केली. हा परफॉर्मन्स पाहून उपस्थितांनी तिचे कौतुक केले.

    राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

    ना उदय सामंत यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. सौम्या गुप्ता अतिशय हुशार, कष्टाळू व राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. सौम्या ही एक समृद्ध शिक्षण शिकवण्याच्या प्रक्रियेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ती केवळ तिचे संगीत कौशल्य विकसित करत नाही तर तिला विविध ऑलिम्पियाड परीक्षांमध्ये देखील १४ सुवर्ण पदके मिळाली आहेत. यावेळी ना सामंत यांनी तिचे वडील आणि सतार गुरू डॉ. अभिनंदन गुप्ता यांचे कौतुक केले.

    गोल्डन गर्ल

    तिला गोल्डन गर्ल म्हणून संबोधण्यात आले असून तिने अनेक सुवर्णपदके आणि पुरस्कार मिळवले आहेत. या आधीही शालेय शिक्षणमंत्र्यांनी तिचा अतुलनीय अभ्यासक म्हणून गौरव केला तर, बालविकास मंत्र्यांनी तिचा एक असामान्य कलाकार म्हणून गौरव केला आहे. सौम्याला बालरत्न, अकोला गौरव पुरस्कार, कला गौरव इ. अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तिने माउंट कार्मेल शाळेचे प्राचार्य मॅथ्यू, शिक्षक, तिचे आजी आजोबा आणि तिचे सितार गुरू व वडील डॉ अभिनंदन गुप्ता यांना यशाचे श्रेय दिले.

    पंडित रविशंकर यांचा आदर्श

    सौम्याने अधिक शिकण्याची इच्छा आहे. तसेच पंडित रविशंकर आणि त्यांची पुत्री अनुष्का यांच्याप्रमाणे वडिलांसोबत जगभरात परफॉर्म करून देशाची कीर्ती जगभरात पसरविण्याची इच्छा तिने व्यक्त केली. तिच्या या कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.