घरफोडी करून चोरट्यांनी तीन लाख 79 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने पळविले

घरफोडी करून चोरटयांनी घरातून तीन लाख 79 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी संतनगर मोशी प्राधिकरण येथे घडली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पिंपरी : घरफोडी करून चोरटयांनी घरातून तीन लाख 79 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी संतनगर मोशी प्राधिकरण येथे घडली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    संदीप बबन मांढरे (वय 45, रा. संतनगर, मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर सोमवारी सकाळी दहा ते दुपारी साडेतीन वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरटयांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून 12.2 तोळे वजनाचे सोन्याचे आणि चांदीचे 3 लाख 79 हजार 500 रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.