पोटनिवडणुका बिनविरोध होणार?, कसबा, चिंचवडबाबत अजित पवार यांचे संकेत; महाविकास आघाडीच्या बैठकीत होणार निर्णय

कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाची पाेटनिवडणुक बिनविराेध हाेण्याचे संकेत विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले आहे. महाविकास आघाडीच्या २५ जानेवारीच्या बैठकीत पाेटनिवडणुकीसंदर्भात निर्णय हाेईल असे पवार यांनी नमूद करतानाच कार्यकर्ते निवडणूक लढविण्याच्या बाजुने असल्याचे स्पष्ट केले.

  पुणे : कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाची पाेटनिवडणुक बिनविराेध हाेण्याचे संकेत विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले आहे. महाविकास आघाडीच्या २५ जानेवारीच्या बैठकीत पाेटनिवडणुकीसंदर्भात निर्णय हाेईल असे पवार यांनी नमूद करतानाच कार्यकर्ते निवडणूक लढविण्याच्या बाजुने असल्याचे स्पष्ट केले.

  वसंतदादा शुगर इन्सि्टट्युटची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी बाेलताना, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील या दाेन विधानसभा मतदारसंघातील पाेट निवडणूक विषयी मत मांडले. ते म्हणाले, ‘‘ पुढील आठवड्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक हाेणार आहे. यात चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुक बाबत चर्चा हाेणार अाहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी पवार साहेबांना भेटणार आहेत. माझ्याकडे ही त्यांनी निवडणूक लढविण्याची ईच्छा व्यक्त केलेली आहे. भाजप कडून शंकर जगताप अथवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचं नाव कळवले आहे. तसंच कसबा विधानसभा साठी भाजपची काही नावं पुढं येत आहे. तसंच दिवंगत मुक्ता टिळक यांचे पती ही इच्छुक आहेत. त्यांचा निर्णय भाजप घेतील आम्ही त्यात नाक खुपसने गरजेचं नाही. मात्र दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी अशी ईच्छा दोन्ही शहरातील आमच्या कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळं ही पोट निवडणूक बिनविरोध होईल का याबाबत मला शंका आहे.’

  कायदा सुव्यवस्था बिघडता कामा नये 

  पुण्यात रविवारी (आज ) हाेणाऱ्या हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे, याविषयी पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ‘सध्या वाढती महागाई, बेरोजगारी,आणि देशाचे केंद्रीय मंत्री यांनी आर्थिक मंदी बाबत केलेल्या विधानाने निश्चित चिंता निर्माण झाली आहे. पुढे हीच स्थिती राहीली तर लाेकांच्या मनात राेष निर्माण हाेऊ शकताे. अशा परीस्थितीत जातीय तणाव निर्माण करून सत्ता मिळविण्याचा काेण प्रयत्न करीत असेल तर ती लाेकशाहीची थट्टा आहे. आपल्याकडील सर्व धर्म समभाव या शिकवणीला तिलांजली देण्याचे काम सुरु आहे. देशातील कायदा व सुव्यवस्था देखील बिघडता कामा नये. आणि यासाठी आमच्या सहित विविध संघटनेने देखील सामंजस्य भूमिका घेतली पाहिजे.’

  मोक्का लावा

  कोयता गँग बाबत पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, कोयता गँगची दहशत अद्याप सुरू आहे. ती दहशत मोडून काढायला हवी, त्यांना ठेचून काढायला हवं, मोक्का लावायला हवा. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलेन असे देखील यावेळी पवार म्हणाले.