कै. संजीवनी करंदीकर यांच्या निधनाने शिवसैनिकांचा मायेचा आणखी एक हात हरवला : डॉ. नीलम गोऱ्हे

प्रबोधनकार ठाकरे यांच्या सुकन्या, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आत्या श्रीमती संजीवनी करंदीकर यांचे नुकतेच पुणे येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांची सुकन्या कीर्ती फाटक आणि सर्व करंदीकर कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. अशी प्रतिक्रिया निलम गोऱ्हे यांनी दिली आहे. 

    मुंबई : प्रबोधनकार ठाकरे यांच्या सुकन्या, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आत्या श्रीमती संजीवनी करंदीकर यांचे नुकतेच पुणे येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांची सुकन्या कीर्ती फाटक आणि सर्व करंदीकर कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. अशी प्रतिक्रिया निलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

    विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना उपनेत्या या नात्याने माननीय संजीवनी करंदीकर यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या निधनाने संपूर्ण शिवसेना परिवाराला असलेला मायेचा आणखी एक हात आज गमावला आहे. त्यांच्या जाण्याने झालेले दुःख कधीही भरून न येणारे आहे.

    प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा, त्यांनी आयुष्यामध्ये दाखवलेले धाडस आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासातून तयार झालेली समाजाच्या प्रश्नांकडे पाहण्याची अभ्यासपूर्ण दृष्टी त्यांनी जोपासली होती. त्यांची शिकवण, संस्कार आणि विचार यांचे ऋण शिवसेना परिवारावर कायमच राहतील. असंही त्या म्हणाल्या.