मंत्रीमंडळ विस्ताराला सुरुवात, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली शपथ

माजी मंत्री व ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. २०१९ च्या निवडणुकीआधी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या विखे पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन आम्ही प्रत्येकाचा सन्मान राखतो, असा संदेश पुन्हा एकदा देण्याचा प्रयत्न केला आहे.

    मुंबई : शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला (Cabinate Expansion) सुरुवात झाली आहे. शिंदे गटातील महत्तावाच्या नेत्यांसोबत भाजपचे दिग्गज नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचीही उपस्थिती आहे. नुकतंच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrushna Vikhe Patil)  यांनी  शपथ घेतली आहे.

    माजी मंत्री व ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. २०१९ च्या निवडणुकीआधी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या विखे पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन आम्ही प्रत्येकाचा सन्मान राखतो, असा संदेश पुन्हा एकदा देण्याचा प्रयत्न केला आहे.

    २०१९ मध्ये ते भाजपात ते दाखल झाले. त्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. १९९४ पासून ते अहमदनगर जिल्ह्यात निवजून येत आहेत. त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील देखील खासदार असून विखे यांचा राजकारणात दबदबा आहे.