मंत्रीमंडळ विस्ताराला सुरुवात, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रीपदाची घेतली शपथ

शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळा विस्ताराला (Cabinate Expansion)  सुरुवात झाली आहे. नुकतंच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी (Sudhir Mungantiwar)  शपथ घेतली आहे.

    मुंबई : शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळा विस्ताराला (Cabinate Expansion) सुरुवात झाली आहे. शिंदे गटातील महत्तावाच्या नेत्यांसोबत भाजपचे दिग्गज नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचीही उपस्थिती आहे. नुकतंच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी (Sudhir Mungantiwar) शपथ घेतली आहे.

    भाजप नेते सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी नुकंतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा,  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah)यांची भेट घेतली होती. पक्ष वाढीच्या व विस्ताराच्या दृष्टीनं चर्चा करण्यात आल्याचे माहिती मुनगंटीवार यांनी दिली होती. तसेच पक्ष संघटनेबाबत अमित शहा यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे.