मंत्रीमंडळ विस्ताराला सुरुवात, शिंदे गटातील दादा भुसे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

आमदार दादा भुसे हे सामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना राजकीय पार्श्‍वभूमी नव्हती. त्यांच्या मतदारसंघात हिरे घराण्याचे राजकीय ताकद असताना त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे.

    मुंबई : शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला (Cabinate Expansion) सुरुवात झाली आहे. शिंदे गटातील महत्तावाच्या नेत्यांसोबत भाजपचे दिग्गज नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचीही उपस्थिती आहे. नुकतंच शिंदे गटातील दादा भुसे यांनी ( Dada Bhuse) यांनी शपथ घेतली आहे.

    आमदार दादा भुसे हे सामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना राजकीय पार्श्‍वभूमी नव्हती. त्यांच्या मतदारसंघात हिरे घराण्याचे राजकीय ताकद असताना त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. सलग चौथ्यांदा विजयी झाले असून महाविकास आघाडीमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाली होती. त्यांना कृषीमंत्री पद देण्यात आले होते. आताही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंळात स्थान मिळाले आहे.

    दादा भुसे यांनी युती सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून काम केले होतो. तसेच त्यांच्याकडे कृषी मंत्रीपदासारखी जबाबदारी देण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती त्याची मोठी जबाबदारी भुसे यांच्याकडे देण्यात आली होती.