मंत्रीमंडळ विस्ताराला सुरुवात, आमदार अब्दुल सत्तार यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला (Cabinate Expansion) सुरुवात झाली आहे. शिंदे गटातील महत्तावाच्या नेत्यांसोबत भाजपचे दिग्गज नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहे. यामध्ये सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि यांना मंत्रिपद मिळालं आहे. नुकतीचं  अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

    तब्बल ४० दिवसानंतर एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळ विस्ताराला आज मुहूर्त मिळाला आहे. यात औरंगाबाद जिल्ह्याच्या वाट्याला तीन मंत्रिपदे आली आहेत. यामध्ये सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि यांना मंत्रिपद मिळालं आहे. नुकतीचं  अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

    सोमवारी दिवसभर आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे टीईटी घोटाळ्यात आल्याने संंपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. याबाबत अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रीया देत, हा कट असून विनाकारण बदनामी करत असल्याचा आरोप केला आहे.  त्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावर प्रश्नचिन्ह होते. मात्र, सर्व शंका दूर करत सत्तार यांचा समावेश झाला आहे.