हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार ? शिंदे गटाच्या आमदारांची माहिती

आशिष जयस्वाल म्हणाले की, मला असे वाटते की अधिवेशनाच्या पूर्वी विस्तार होईल. तेव्हा सर्व चर्चेला विराम लागेल. अगोदर मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यानंतर महामंडळाचे वाटप होईल, अशी शक्यता जयस्वाल यांनी वर्तवली.

    मुंबई – हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांनी दिली. त्यामुळे या विस्तारात कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागलीय. मंत्रिपद न मिळाल्यामुळे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट ते बच्चू कडूपर्यंत अनेक जण नाराज आहेत. या विस्तारात त्यांना संधी मिळते का, हे पाहावे लागेल.

    आशिष जयस्वाल म्हणाले की, मला असे वाटते की अधिवेशनाच्या पूर्वी विस्तार होईल. तेव्हा सर्व चर्चेला विराम लागेल. अगोदर मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यानंतर महामंडळाचे वाटप होईल, अशी शक्यता जयस्वाल यांनी वर्तवली.

    राज्यातल्या महामंडळाचे वाटपही रखडले आहे. ज्यांना मंत्रिपद मिळणार नाही, त्यांची महामंडळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे शिंदे गटासोबत येणारे अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. अनेक जण नाराजी दाखवत आहेत. संजय शिरसाटांनी या नाराजीतून ट्विट करून ते नंतर डिलिट केले. त्याची चर्चा चांगलीच रंगली होती.