आज मंत्रिमंडळ विस्तार; पुढील आठवड्यात पावसाळी अधिवेशन

शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी आज होणार आहे. राजभवनातील दरबार हॉल हा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, मंत्रिमंडळ विस्तार होताच पावसाळी अधिवेशन घेण्याच्याही हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या १७ ते २६ ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशन होणार आहे.

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारचा आज सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होणार आहे. शिंदे गटाचे समर्थक आमदार त्यांच्या मतदारसंघांतून मुंबईत दाखल झाले आहेत. तर, भाजपचे (BJP) संभाव्य मंत्रीही पोहोचले असून भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण १८ मंत्री शपथ घेणार आहेत.

    शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी (Oath Ceremony) आज होणार आहे. राजभवनातील (Raj Bhavan) दरबार हॉल हा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, मंत्रिमंडळ विस्तार होताच पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) घेण्याच्याही हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या १७ ते २६ ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशन होणार आहे.

    मंत्रिपदाची शपथ घेणारे भाजपतील संभाव्य ९ जणांची नावे समोर आली आहेत. पण त्यातही भाजपचे ११ जण शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपातील एक महिला आमदार शपथ घेतील असा अंदाज असून त्या महिला आमदार कोण, हे कळलेले नाही. मात्र, ९ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.