My dream is to run a flying bus in Nagpur - Union Minister Nitin Gadkari

अनेकदा तर त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारचे कान देखील टोचले आहेत. सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना गडकरी मागेपुढे पाहात नाहीत, असा त्यांचा इतिहास आहे. या पार्श्वभूमवीर नितीन गडकरींचं भाषण म्हणजे अशाच खुमासदार टोलेबाजीने भरलेली असणार, हे गणितच झालं आहे. नुकतीच गडकरींनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना केलेली टोलेबाजी अशीच उपस्थितांचा हशा मिळवून गेली.

    नागपूर – केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे सर्वपरिचित आहेत. अनेक सभा आणि कार्यक्रमांमधून नितीन गडकरींनी स्टेजवर केलेल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली आहे. अनेकदा तर त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारचे कान देखील टोचले आहेत. सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना गडकरी मागेपुढे पाहात नाहीत, असा त्यांचा इतिहास आहे. या पार्श्वभूमवीर नितीन गडकरींचं भाषण म्हणजे अशाच खुमासदार टोलेबाजीने भरलेली असणार, हे गणितच झालं आहे. नुकतीच गडकरींनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना केलेली टोलेबाजी अशीच उपस्थितांचा हशा मिळवून गेली.

    नितीन गडकरींनी नागपूरमध्ये झालेल्या अॅग्रो व्हिजन फाऊंडेशनच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात नितीन गडकरींनी शेतकऱ्यांना उत्पादन आणि बाजारपेठ यासंदर्भात मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी मालासाठी बाजारपेठेचं गणित कसं जुळवून आणायचं, यावर बोलताना केलेल्या टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.