एसटीचा उपयोग राजकीय सेवेसाठी केल्याचा ठपका ठेवत कॅगने ओढले ताशेरे; कोट्यवधींचा खर्च; धोरणाविरोधात उधळपट्टी सर्वच काढलं बाहेर !

एसटी राजकारण्यांच्या (ST for Politician) सेवेसाठी असा ठपका देशाच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी (CAG) ठेवला आहे. राज्यातील महामंडळ नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे ठिकाण असल्याची जी धारणा तयार झाली आहे, त्याला कॅगच्या अहवालामुळे दुजोराही मिळाला आहे.

    मुंबई : एसटी राजकारण्यांच्या (ST for Politician) सेवेसाठी असा ठपका देशाच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी (CAG) ठेवला आहे. राज्यातील महामंडळ नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे ठिकाण असल्याची जी धारणा तयार झाली आहे, त्याला कॅगच्या अहवालामुळे दुजोराही मिळाला आहे. आवश्यकता नसताना नेत्यांच्या आग्रहाखातर महामंडळाने स्वतःच्या धोरणाविरोधात कोट्यवधींची उधळपट्टी केल्याचा ठपकादेखील कॅगने ठेवला आहे. आगार निर्मितीच्या नावावर महामंडळाने चार कोटींचा निष्फळ खर्च केल्याचे ताशेरेही कॅगने कारभारावर ओढले आहेत.

    आयुष्मान भारत-जल आरोग्य PM-JAY प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबाबत (पीएमजेएवाय) संदर्भातही कॅगने धक्कादायक अहवाल सादर केला आहे. आधीच मृत्यू झालेल्या जवळपास 3500 रुग्णांच्या उपचारासाठी सुमारे 7 कोटी रुपये देण्यात आल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. हे सर्व रुग्ण डेटाबेसमध्ये मृत दाखवण्यात आले आहेत. कॅगने आयुष्मान भारत योजनेच्या डेटाबेसचे ऑडिट सुरू केले तेव्हा त्यात अशा प्रकारची अनियमितता आढळली.

    …ही तर मोदींविरोधी संघटना

    देशात एक देशद्रोही, मोदीविरोधी संघटना आहे, तिचे नाव आहे कॅग. अशा संस्थेवर पंतप्रधान मोदींनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या यंत्रणांद्वारे त्वरित छापे टाकायला हवे.

    – सुप्रिया श्रीनेत, प्रवक्त्या, काँग्रेस