
चिमुकल्या मुलीला घरात बोलवून एका नराधमाने तिच्याशी अश्लील चाळेकरून लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ९ वर्षीय मुलीला त्याने कोणाला काही सांगितल्यास मारून टाकण्याची धमकीही दिली. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गोमाजी रामा गायकवाड (वय ३५) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पुणे : चिमुकल्या मुलीला घरात बोलवून एका नराधमाने तिच्याशी अश्लील चाळेकरून लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ९ वर्षीय मुलीला त्याने कोणाला काही सांगितल्यास मारून टाकण्याची धमकीही दिली. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गोमाजी रामा गायकवाड (वय ३५) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
याबाबत पिडीत मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आहे. एकाच भागात राहत असल्याने गोमाजी हा मुलीला ओळखत होता. मुलगी जात असताना त्याने या मुलीला स्वत:च्या घरात बोलवून घेतले. घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन तिचे कपडे काढून तिच्याशी अश्लील चाळे केले. त्यानंतर तिला हा प्रकार कोणाला सांगितल्यास मारून टाकीन अशी धमकी दिली. चिमुकली घाबरली होती. ती घरी गेल्यानंतर तिची आवस्था पाहून आईने तिला प्रकार विचारला. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. पुढील तपास पोलीस करत आहेत.