uday samant

मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना ते पुण्यातील दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेणार होते. यासाठी उदय सामंत हे देखील दगडुशेठच्या दिशेने जात होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या समर्थकांनी सामंतांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात गाडीतील एक जण जखमी झाला आहे.

    मुंबई – शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी हल्ला करण्यात आला. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या दिशेने ते जात असताना शिवसैनिकांकडून हा हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या घटनेत सामंत यांच्या गाडीतील एक जण जखमी झाला असून उदय सामंत मात्र सुरक्षित आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता तरी आम्ही शांत असून, आता मात्र आमचा अंत पाहू नका” असा इशारा सामंतांनी शिवसेनेला दिला आहे.

    मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना ते पुण्यातील दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेणार होते. यासाठी उदय सामंत हे देखील दगडुशेठच्या दिशेने जात होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या समर्थकांनी सामंतांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात गाडीतील एक जण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर सामंत यांनी ट्विट करुन या हल्लाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

    ते म्हणाले की, “गद्दार म्हणता तरी शांत आहे…शिव्या घालता तरी शांत आहे..आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे.. लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल.. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही..काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका.. जय महाराष्ट्र”