मुंबईवरून गावी लग्नासाठी आला, हळदीला जाताना युवकाचा अपघाती मृत्यू , खेड खोपी मार्गावर भीषण अपघात

    खेड : अलीकडे रस्ते अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे असाच एक भीषण अपघात खेड तालुक्यात कुंभाड ते खोपी या मार्गावर झाला भरधाव रिक्षा टेम्पो ने दुचाकी स्वराला उडवल्याने 23 वर्षे युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अंकीत तांबे (वय – 23 , रा. कुंभाड ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. अंकित तांबे हा चार दिवसांपूर्वीच मुंबई येथून आपल्या मावस भावाच्या लग्नासाठी गावी आला होता. तो आयनी मेटे येथे लग्नाच्या हळदीसाठी निघाला होता यावेळी मन हेलावून टाकणारी दुर्दैवी घट घडली.

    अंकित हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता हे कुटुंब मुंबई येथे नोकरी धंदा निमित्त वास्तव्यास आहे. अंकितच्या अपघाती मृत्यूने कुंभाड परिसरातून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मावस भावाच्या लग्नासाठी आलेल्या अंकितच्या मृत्यूने या सोमवारी झालेल्या लग्नावेळी दुःखाचं सावट होतं अशी माहिती स्थानिकांनी दिली.

    खोपी ते कुंभाड जाणा-या रोडवर किन्नांचा वाडा गायकवड येथे अपघात झाला. टेम्पो क्रमांक एम.एच.०८/बी.सी/०२३२ वरील चालक नामे शुभम घोरपडे रा. मिर्ले हुंबरवाडी याने हयगयीने बेदरकारपणे भाव वेगाने चालवुन दुर्लक्ष करुन मोटार सायकल क्रमांक एम.एच.४८/बी.झेड/३२७८ यास समोरुन धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या भीषण अपघातात अंकीत तांबे यास डाव्या डोळ्याला तोंडाला छातीला गंभीर स्वरुपाच्या दुखापती होवुन त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या रुपेश सावंत याच्या डोक्याला कपाळाला तोंडाला मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी कळंबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी उशिरा हा अपघात झाला होता.

    कुंभाड बैद्धवाडी येथील राजेंद्र जानु तांबे यांनी या अपघात प्रकरणाची फिर्याद खेड पोलीस स्थानकात दाखल केली आहे. शुभम संतोष घोरपडे रा. मिर्ले हुंबरवाडी या संशित टेम्पो चालकावरती या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघात प्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करत आहेत