Can reach Mumbai as accompanied by truck driver - Thrilling journey of Shiv Sena MLA Kailas Patil

वर्षा बंगल्याबाहेर (Varsha bungalows) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद (Press conference ) घेतली. त्यात कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांना आपल्या सुटकेचा प्रवास सांगण्यास सांगितले. ज्या शिवसेनेने मला जिल्हाप्रमुख केलं, आमदार केलं, त्यांच्याशी प्रतारणा करणं मला पटलं नाही, अशी भावना यावेळी कैलास पाटलांनी व्यक्त केली.

    मुंबई : उस्मानाबाद येथील शिवसेना आमदार कैलास पाटील (Shiv Sena MLA Kailas Patil ) आणि अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांना शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गटात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती नेले. आम्हीच स्वतःची कशीबशी सुटका करुन घेतली, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर वर्षा बंगल्याबाहेर (Varsha bungalows) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद (Press conference ) घेतली. त्यात कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांना आपल्या सुटकेचा प्रवास सांगण्यास सांगितले. ज्या शिवसेनेने मला जिल्हाप्रमुख केलं, आमदार केलं, त्यांच्याशी प्रतारणा करणं मला पटलं नाही, अशी भावना यावेळी कैलास पाटलांनी व्यक्त केली. आणि त्यांनी पत्रकार परिषदेत आपला थराराक प्रवास सांगितला.

    मला एकनाथ शिंदे यांनी बोलावले. ते नगरविकास मंत्री असल्यामुळे तिथे काही काम असेल या अपेक्षेने मी गेलो. तेथूनच मला ठाणे महापौर बंगल्यावर नेण्यात आले. तेथे गाडी बदलून आम्ही निघालो. पुढे ठाणे-वसई-विरार पार करत पर्यंतही मला काहीच माहिती नव्हत. नंतर बॉर्डरवर चेकपोस्ट पार केल्यावर मला शंका आली. पुढे नाकाबंदी असल्यामुळे त्यांनी मला चालत येता का ? असे विचारले.  मला संधी मिळाली.  मी गाडीतून बाहेर पडलो. आणि डिव्हायडर ओलांडून मुंबईच्या दिशेने निघालो. ते माझ्या मागे येतील म्हणून मी पुन्हा सूरतच्या दिशेने असलेल्या ट्राफिकमध्ये शिरलो. ट्रकच्या रांगांमधून चालता चालता एका बाईकवाल्याने मला गावापर्यंत सोडले. एका हॉटेलजवळ काही ट्रकवाल्यांना विचारल परंतु, त्यांनी मला सोडलं नाही. यावेळी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला परंतु, मोबाईलची बॅटरी ७-८ टक्क्यावर असल्यामुळे माझा गोंधळ उडाला. यूपीच्या ट्रकवाल्याने माझी विनंती मान्य केली. आणि मी पोहोचलो.