संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

विदर्भाच्या औद्योगिक विकासाला गती देण्याची क्षमता असलेला भंडारा जिल्ह्यातील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड 'भेल' प्रकल्पाची लीज एमआयडीसीने (MIDC Canceled Lease of BHEL) रद्द केल्याचे समोर आले आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्प अचानक रद्द झाल्यामुळे उद्योगविना असलेला भंडारा जिल्हा उद्योगाला पोरका झाला आहे.

  भंडारा : विदर्भाच्या औद्योगिक विकासाला गती देण्याची क्षमता असलेला भंडारा जिल्ह्यातील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ‘भेल’ प्रकल्पाची लीज एमआयडीसीने (MIDC Canceled Lease of BHEL) रद्द केल्याचे समोर आले आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्प अचानक रद्द झाल्यामुळे उद्योगविना असलेला भंडारा जिल्हा उद्योगाला पोरका झाला आहे.

  राष्ट्रीय महामार्गावरील मुंडीपार (साकोली) येथे वीजनिर्मितीसाठी लागणारी उपकरणे तयार करण्याचा ‘भेल’ प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 10 वर्षांपूर्वी 270 शेतकऱ्यांकडून 510 एकर जागा खरेदी केली होती. तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी यासाठी प्रयत्न केले होते. मे 2013 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते.

  सत्तांतर होताच प्रकल्पाला घरघर

  2014 मध्ये देशात सत्तांतर झाले आणि हा प्रकल्प रखडला. काम सुरू व्हावे, यासाठी नागपूर एमआयडीसीने मार्च 2014, फेब्रुवारी 2017 आणि 2023 मध्ये अवजड प्रकल्प सुरू करण्यासाठी ‘भेल’कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नागपूर एमआयडीसीचे विभागीय अधिकारी एम.डी. पटेल यांनी ‘भेल’ कंपनीला 11 ऑगस्टला पत्र पाठवून ही लीज रद्द केली.

  अधिग्रहित जमिनीची लीज रद्द झाल्यानंतर अन्य उद्योगासाठी राखीव केली जाऊ शकते अथवा खासगी उद्योगपतीच्या हातात सोपविली जाऊ शकते. जिल्हा विकासासाठी औद्योगिक क्रांती होणे आवश्यक आहे. याद्वारे युवकांनाही रोजगार मिळेल.

  – डॉ. परिणय फुके, माजी पालकमंत्री