
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिरवळ मध्ये मंगळवारी सायंकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने कॅंडल मार्च काढण्यात आला. तर मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी नागरिकांनी मोबाईल टॉर्च व मेणबत्ती लावून आरक्षण मागणीच्या घोषणा देत पायी मोर्चा काढला.
शिरवळ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिरवळ मध्ये मंगळवारी सायंकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने कॅंडल मार्च काढण्यात आला. तर मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी नागरिकांनी मोबाईल टॉर्च व मेणबत्ती लावून आरक्षण मागणीच्या घोषणा देत पायी मोर्चा काढला. छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळ्या पासून कँडल मार्चला सुरुवात झाली. शिरवळ गावठाण परिसरात हा कँडल मार्च काढण्यात आला यामध्ये मराठा बांधव दाखल झाले. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
तेथे जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. एक मराठा लाख मराठा घोषणेने परिसरात दणदणला. मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर या राजकीय नेत्यांनी अनेक वर्षे झुलवत ठेवले आहे. आरक्षणाची टक्केवारी सुद्धा फसवी असल्याचा आरोप सकल मराठा समाजाकडून केला आहे. जो पर्यंत सरकार मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देत नाही, तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे. गावामध्ये सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांना प्रवेश बंद व मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्याचे फ्लेक्स लावले आहेत. या उपोषणात लहान मुले, महिला, वयोवृद्ध, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. सुमारे १००० पेक्षा अधिक मराठा बांधव या कँडल मार्च मध्ये सहभागी झाले होते.
शिरवळ सह परिसरातील गावात राजकीय नेते व पुढारी यांना गावबंदीचा करण्यात आली, आपली पद प्रतिष्ठा सांभाळून गावात प्रवेश करण्याच्या सूचना राजकीय व्यक्तींना दिला असून ठिकठिकाणी उपोषण सुरू आहे.