साखर उद्योगासमोर ऊस टंचाईचे संकट; कर्नाटकाकडून होणारी पळवापळवी रोखण्याचे आव्हान

राज्यातील साखर कारख्यान्यांपुढे ऊस टंचाई संकट आहे. अपुऱ्या पावसामुळे यंदा उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे हंगामात पूर्णवेळ कारखाना चालविण्यासाठी ऊस कोठून आणायचा असा प्रश्न आहे. यातून ऊसाची मोठ्याप्रमाणात पळवापळवी होण्याची भिती राज्य सहकारी साखर कारखाना संघाने व्यक्त केली आहे.

    मुंबई : राज्यातील साखर कारख्यान्यांपुढे ऊस टंचाई संकट आहे. अपुऱ्या पावसामुळे यंदा उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे हंगामात पूर्णवेळ कारखाना चालविण्यासाठी ऊस कोठून आणायचा असा प्रश्न आहे. यातून ऊसाची मोठ्याप्रमाणात पळवापळवी होण्याची भिती राज्य सहकारी साखर कारखाना संघाने व्यक्त केली आहे.

    कर्नाटकातील कारखान्यांकडून होणारी ऊसाची पळवापळवी रोखण्याचीरोखण्याचीही मागणी संघाने केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 50 ते 60 लाख मेट्रिक टन ऊसाची घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यात यंदा 14.7 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड आहे. गाळपासाठी 1020 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. त्यातून 90 ते 95 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा सहकार विभागाने व्यक्त केली आहे.

    चारा टंचाईची समस्या दूर करण्यासाठीही ऊसाचा वापर केला जाऊ शकतो. परिणामी सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात कारखान्यांसमोर ऊसाची उपलब्धता ही निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    साखर आयुक्तांना पत्र

    संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी याबाबत साखर आयुक्तांना पाठविलेल्या पत्रामध्ये राज्यातील ऊस टंचाईची समस्या लक्षात घेता साखर कारखान्यांकडून सीमाभागातून होणाऱ्या ऊसाची पळवापळवी बंद करुन आंतरराज्य ऊस निर्यातीत बंदी घालावी. गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी गुऱ्हाळ आणि खांडसरी उद्योग सुरु करण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी केली आहे. तर यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्याबाबत लवकरच मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार असून, त्यात गाळप हंगाम कधीपासून सुरु करायचा, गुऱ्हाळ आणि खांडसरी आणि परराज्यात ऊस नेण्यात बंदी घालण्याबाबतही निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.