बीडमध्ये कार आणि टेम्पोत धडक, सहा जणांचा जागीच मृत्यू

या अपघातमध्ये ज्यांचा मृत्यू झाला ते सर्वजण पुण्याचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात एवढा भीषण होता की, कार पूर्णपणे टेम्पोच्या खाली गेली होती, तिला बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली.

    बीड : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाताची बातमी ताजी असतानाच, आता बीडमधून अपघाताची बातमी समोर येत आाहे. बीडच्या पाटोदा-मांजरसुभा मार्गावर चारचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण जागीच मृत्यू झाला. (Beed Accident News)

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडच्या पाटोदा -मांजरसुभा रोडवरील पाटोदया जवळ बामदळे वस्ती येथे स्विफ्ट डिझायर कार-आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल सहा जण जागीच ठार झाल्याचे दिसून येतो. घटनास्थळी पाटोदा पोलीस व सामाजिक कार्यकर्ते दाखल होऊन अपघातातील व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे.

    तर, या अपघातमध्ये ज्यांचा मृत्यू झाला ते सर्वजण पुण्याचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात एवढा भीषण होता की, कार पूर्णपणे टेम्पोच्या खाली गेली होती, तिला बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली.