vardha accident

वर्धा ते नागपुरदरम्यान (Wardha - Nagpur Road) केळझर शिवारात बायपास मार्गावरील पुलावर बुधवारी रात्री अपघात झाला. अपघातात कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

    वर्धा : भरधाव वेगातील कार पुढे जात असलेल्या ट्रकवर (Car And Truck Accident) आदळली. या अपघातात दोन जण जागीच (Two Dead In Accident) ठार झाले. तसेच दोन जण जखमी झाले आहेत. वर्धा ते नागपुरदरम्यान (wardha – Nagpur Road) केळझर शिवारात बायपास मार्गावरील पुलावर बुधवारी रात्री हा अपघात घडला. अपघातात कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

    नागपूरकडून मैदा भरलेला एक ट्रक कर्नाटकला जात होता. दरम्यान याचवेळी ट्रकच्या मागून भरधाव कार ट्रकवर आदळली. यात कारमधील दोघे जागीच ठार झाल्याचे सांगण्यात आले. बाकीचे दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.  पोलीस आणि नागरिकांनी मदतकार्य सुरु केले. घटनास्थळी सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र कोहळे, गजानन वाठ, अखिलेश गव्हाणे, अनिल भोवरे, सचिन वाटखेडे यांनी पंचनामा केला.