इतिहासाचा अनमोल ठेवा! कर्नाक रोड ओव्हर ब्रीजच्या शीळांचे होणार हेरिटेज जतन

पुलाच्या दोन्ही टोकांना पुलाचे नाव आणि बांधकामाचे वर्ष लिहिलेले बेसाल्ट दगड (Basalt Stones) होते. शिलालेख असलेले असे ६ शीळा (दगड) होते. १८५८ च्या शिलालेखांमुळे पुलाचे बांधकाम त्या वर्षी सुरू झाले असावे.

    मुंबई: मध्य रेल्वेने (Central Railway) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई (CSMT, Mumbai) आणि मशीद रेल्वे स्थानकांदरम्यानचा (Masjid Railway Station) १५४ वर्षे जुना कर्नाक रोड ओव्हर ब्रीज नुकताच पाडला (154 years old carnac road over bridge was recently demolished). कर्नाक स्टील स्ट्रक्चर ब्रीज (Carnac Steel Structure Bridge) १८६८ मध्ये बांधण्यात आला. पुलाची लांबी ५० मीटर आणि रुंदी १८.८ मीटर होती आणि त्याला ७ स्पॅन होते. पुलाचे अंदाजे वजन ४५० टन होते.

    पुलाच्या दोन्ही टोकांना पुलाचे नाव आणि बांधकामाचे वर्ष लिहिलेले बेसाल्ट दगड (Basalt Stones) होते. शिलालेख असलेले असे ६ शीळा (दगड) होते. १८५८ च्या शिलालेखांमुळे पुलाचे बांधकाम त्या वर्षी सुरू झाले असावे.

    मध्य रेल्वेने या ६ शीळा पी. डी’मेलो रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हेरिटेज गल्ली येथे जतन केले असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.