Carrot show agitation in Beed with Dhananjay Munde as Guardian Minister

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना गाजर दाखवून हे आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे या आंदोलनाची दिवसभरात चर्चा रंगली(Carrot Show Agitation in Beed with Dhananjay Munde as Guardian Minister).

    जिल्ह्यातील 264 शाळांमधील 640 वर्गखोल्या धोकादायक आहेत. तर अनेक शाळा उघड्यावर असून 437 शाळांमध्ये मुलींना तर 275 शाळांमध्ये मुलांना स्वच्छतागृह नाही. त्यामुळे या शाळांमध्ये तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी करत हे आगळे वेगळे आंदोलन केले गेले.

    सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केवळ प्रसिद्धी माध्यमातून विकासाचे गाजर दाखवत आहेत. जिल्ह्यातील या शाळांच्या दुरवस्थेमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला लागलेत. आणि याचाच निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येतंय. दरम्यान यावेळी जिल्हा प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.